पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींनंतर राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना टोमणा

राहुल गांधी

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारला. मध्य प्रदेशमधील लोकांनी निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्यात पंतप्रधान व्यग्र असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीचा फायदा सामान्य लोकांना मिळवून द्या. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा, अशी मागणी त्यांनी केली.

SBI ने एका महिन्यात दिला दुसरा झटका, एफडीच्या व्याजदरात घट

राहुल गांधी यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्यात तुम्ही व्यग्र आहात. पण याचवेळी तुम्ही एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. याच घसरणीचा फायदा तुम्ही सामान्यांना देणार आहात का, पेट्रोल दर ६० रुपयांपर्यंत खाली आणणार आहात का, त्याचा अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास फायदाच होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पुण्यात कॉलेजला ३० मार्चपर्यंत सुटी हा व्हायरल मेसेज चुकीचा

मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rahul Gandhi alleges BJP busy destabilising Congress govt day after Jyotiraditya Scindia quits party