पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आर्थिक मंदीची चिंता दूर करण्यासाठी नव्या सुधारणांची गरज'

रघुराम राजन

अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितील मंदी ही चिंताजनक असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने उर्जा आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील वित्तीय समस्येवर तात्काळ उपाय करायला हवेत, असा सल्लाही त्यांनी दिला. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही नव्य योजना देखील आणाव्या लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 

२०१३ ते २०१५ या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाची धूरा सांभाळणाऱ्या रघुराम राजन यांनी राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) मोजणीसंदर्भात नव्या सुधारणेबाबतही नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे सूचित केले. त्यांनी माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांच्या शोध निबंधाचा दाखला देत आर्थिक वृद्धी दर फुगवून सांगितला जात असल्याचे म्हटले आहे. 

मनमोहन सिंग यांची राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवड

राजन यांनी 'सीएनबीसी टीव्ही १८' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील विश्लेषकांकडून आर्थिक वृद्धीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यातील बरेच अंदाज हे सरकारच्या वृद्धी दराच्या कितेकपटीने खालच्या स्तरावर आहेत.  सध्याची आर्थिकस्थिती चिंताजनक असल्याचे वाटते, असेही ते म्हणाले.