पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लोकसभा निवडणुकीतही हारले आणि आता सुप्रीम कोर्टातही'

रविशंकर प्रसाद

राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणात दाखल झालेल्या सर्व फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळल्या. त्याचबरोबर या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेली अवमान याचिकाही न्यायालयाने बंद केली. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी या मुद्द्यावरून आधी लोकसभा निवडणुकीत हारले आणि आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा हारल्याची टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.

पवारांना शेतकऱ्यांची चिंता; विदर्भातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

राफेल प्रकरणाच्या निकालानंतर रविशंकर प्रसाद यांनी भाजपच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांच्याकडून राफेल विमाने खरेदी कराराचा मुद्दा जाणीवपूर्वक मांडण्यात आला. या प्रकरणी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून त्याचाही गैरवापर करण्याचे काम राहुल गांधी यांनी केली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमच्या नेत्यांना चोर म्हटले गेले. तरीही लोकसभा निवडणुकीत ते हारले. आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी हारले आहेत. केवळ माफी मागितली म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरोधातील अवमान याचिका बंद केली. नाहीतर त्यांना शिक्षाच झाली असती. 

... यापुढे जपून बोला, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

न्यायालयात स्वतःला वाचविण्यासाठी तुम्ही माफी मागितली पण आता जनतेच्या न्यायालयात काय तोंड घेऊन जाणार, असा प्रश्न उपस्थित करून रविशंकर प्रसाद म्हणाले, राफेलच्या गुणवत्तेबद्दल कोणालाही शंका नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ज्या रिलायन्स कंपनीवरून सरकारवर टीका करण्यात येते आहे. तिची निवड केंद्र सरकारने नाही तर दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने केली आहे. फ्रान्सच्या सध्याच्या आणि आधीच्या अध्यक्षांबाबतही राहुल गांधी यांनी चुकीच्या पद्धतीने संदर्भ दिला होता. या दोन्ही अध्यक्षांनी लगेचच त्याचा खुलासा केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rafale deal rahul gandhi lost lok sabha elections and now defeated in supreme court as well says bjp