राधाकृष्ण विखे-पाटील हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांना पक्षांतर करण्याचा दीर्घ अनुभव आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. मध्येच ते शिवसेनेत गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता ते भाजपमध्ये आले आहेत. असे नेते आपल्या पक्षात असणे चांगले असते, अशा शब्दांत विखे आणि स्वपक्षालाच टोला लगावला आहे. काँग्रेसचा त्याग करुन आलेल्या विखेंना लगेचच मंत्रिपद देण्याच्या पक्षाच्या कृतीवर त्यांनी उपहासात्मक पद्धतीने आपली भूमिका मांडला. 'एबीपी माझा'शी ते बोलत होते.
अखेर विस्तार झाला, आयात नेत्यांना सर्वांत प्रथम मंत्रिपदाची शपथ
मी व्यक्तिगत कामासाठी दिल्लीत आलो आहे. माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा दिवस अचानक ठरल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर मंत्रिमंडळात जाण्यासाठी मी पूर्वीसारखा उत्साही राहिलेलो नाही, असे म्हणत त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले.
विखे हे सुसंस्कृत नेते आहेत. त्यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांना पक्षांतर करण्याचा मोठा अनुभव आहे. नवीन चांगल्या लोकांना संधी देण्याचे काम पक्ष करत आहे. अशा चांगल्या व्यक्ती पक्षात आल्याशिवाय पक्षाचा विस्तार होत नाही. विखे हे चांगल्या कुटुंबातील आहेत. त्यांना पक्षांतर करण्याचाही दिर्घ अनुभव आहे. त्यांना पक्षात टिकून राहण्यासाठी संस्कार घडवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळेच त्यांना लगेच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याचे ते म्हणाले.
वादग्रस्त प्रकाश मेहतांसह 'या' मंत्र्यांना मिळाला डच्चू
जळगाव जिल्ह्यात भाजप रुजवण्याचे काम केले आहे. जेव्हा खडकाळ जमीन होती. तेव्हा बी पेरले होते. प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवला. आता जमीन भुसभुशीत झाली आहे. आता सत्ता येताच बाजूला केले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंची गरज नाही, अशी खंत व्यक्त करत आपण कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेली ४० वर्षे पक्ष वाढवण्यासाठी झटलो. माझ्यावर पक्षाचे संस्कार आहेत. त्यामुळे पक्ष सोडणार नसल्याचे ते म्हणाले.