पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सासूबाईंनी माझे केस ओढले, मारहाण केली; ऐश्वर्या रायचा आरोप

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांची सून ऐश्वर्या राय

बिहारमधील पाटण्यात १० सर्क्युलर रस्त्यावर माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी रविवारी मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यांची सून ऐश्वर्या राय यांनी सासूबाईंवर गंभीर आरोप केले. सासूबाईंनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला. गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा ऐश्वर्या राय यांनी राबडी देवी आणि सासरच्या अन्य मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

आता आणखी एक राजकीय भूकंप होणार, रामदास आठवलेंचा इशारा

ऐश्वर्या राय यांनी म्हटले आहे की, राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानी नियुक्तीला असलेल्या सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. ही घटना समजल्यावर ऐश्वर्या रायचे वडील आणि आमदार चंद्रिका राय लगेचच घटनास्थळी दाखल झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सचिवालय पोलिस ठाण्यात राबडी देवी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ऐश्वर्या राय यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयातही नेण्यात आले. ऐश्वर्या राय यांनी पोलिस अधीक्षक गरिमा मलिक यांनाही काय घडले याची माहिती दिली.

रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याची तयारी सुरु

घटनेची माहिती मिळाल्यावर सचिवालय पोलिस ठाण्यातील अधिकारी लगेचच राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले होते. या संदर्भात घटनास्थळी गेलेल्या पोलिस गटाने आपला अहवाल दिल्यावरच आम्ही पुढील माहिती देऊ, असे पोलिसांनी सांगितले.