पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाबमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, सुरक्षाव्यवस्था कडक

पंजाबमध्ये  सुरक्षाव्यवस्था कडक

पंजाबला दहशतवादी हल्ल्याचा  इशारा गुप्तचर विभागानं दिला असून पंजाबमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पठाणकोट आणि गुरुदासपूर जिल्ह्यात तपास मोहीम राबली आहे. जवळपास ५ हजारांहून अधिक पोलिस आणि स्पेशल कमांडोंनी तपास मोहीम राबवली असून पुढील तीन दिवस प्रत्येक भागाची कसून चौकशी करण्यात येणार आहे. 

आमच्यासोबत असताना 'राम' होता, भाजपात गेल्यावर 'रावण' झाला

पंजाब पोलिस दलाचे प्रमुख दिनकर गुप्ता  यांची वायूदल, सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, बीएसएफ आणि एनआयएच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पंजाबमधली सुरक्षा वाढवण्यात आली  असून तपास मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये हुसैनीवाला भागात पाकिस्तानी सीमेजवळ एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसताना आढळला होता. त्यापूर्वी ८० किलो वजनाची शस्त्रे आणि दारुगोळा घेऊन ड्रोन भारताच्या हद्दीत आल्याचे तपासात आढळून आले होते. ७ ऑक्टोबरच्या रात्री दहा ते दहा वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान हुसैनीवाला भागामध्ये पाकिस्तानच्या हद्दीत एक ड्रोन पाच वेळा दिसले. यापैकी एकदा ते भारतीय हद्दीत शिरतानाही दिसून आले. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हे ड्रोन दिसले होते. चार वेळा हे ड्रोन पाकिस्तानी हद्दीत घिरट्या घालत असल्याचे दिसून आले होते.

इराणी महिलांनी 'याची डोळा याची देही' अनुभवला फुटबॉल पाहण्याचा आनंद

या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये कसून तपास सुरू आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं पठाणकोट, गुरूदासपुर आणि बाटला येथील  सर्व रुग्णालयांना आपातकालीन परिस्थितीसाठी अतिरिक्त व्यवस्था करावी असं सांगण्यात आलं आहे.