पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

पंजाबमध्ये इमारत कोसळली

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. पंजाबच्या मोहाली भागामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. मोहालीच्या खरड लांडरा रोडजवळ ही इमारत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पंजाब पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

मोहाली येथील तीन मजली इमारत अचानक कोसळली. इमारतीच्या बेस इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अजून ६ ते ७ जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या दुर्घटनेमध्ये कोणतिही जिवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळावर मदतीसाठी १२ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या बेसमेंटमध्ये खोदकाम सुरु होते. त्याचवेळी अचानक इमारत कोसळली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

NZvs IND ODI: किवींनी जीव काढला, सामन्यासह मालिका जिंकली