पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ऑनलाईन चोरीचा फटका, २३ लाखांची चोरी

पतियाळाच्या खासदार प्रणित कौर

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि पतियाळाच्या खासदार प्रणित कौर या स्वतःच ऑनलाईन चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्या. यामध्ये त्यांना तब्बल २३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीमध्ये असतानाच २९ जुलै रोजी हा प्रकार घडला, असे पतियाळाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनदीपसिंग सिद्धू यांनी सांगितले.

पैसे देऊन कोणालाही सोबत घेता येते, गुलामनबी आझाद यांची टीका

या प्रकरणी रांची पोलिसांनी अत्तूल अन्सारी नावाच्या आरोपीला ३ ऑगस्ट रोजी अटक केली असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी पतियाळा पोलिसांचे एक पथक रांचीला पोहोचले आहे. 

या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, आरोपीने स्वतःची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापक म्हणून करून दिली होती. तुमच्या खात्यामध्ये काही पैसे आणि वेतन जमा करायचे आहे. त्यासाठी तुमच्या खात्याची माहिती हवी आहे, असे त्याने प्रणित कौर यांना सांगितले होते. यानंतर प्रणित कौर यांनी आरोपीला स्वतःच्या बँकेची सर्व माहिती, एटीएम कार्डचा नंबर, त्यामागे असलेला सीव्हीव्ही क्रमांक आणि ओटीपी हे सर्व दिले होते. 

कोल्हापूरमधील पूरस्थिती अद्याप गंभीर, नागरिकांचे हाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आमच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर सायबर शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करून अन्सारीचा शोध लावला. अन्सारी हा या टोळीचा म्होरक्या आहे. झारखंडमधील जामतारा गावातून ते ही सगळी टोळी काम करते.