पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिद्धू यांच्या मंत्रिपदाची अखेर, अमरिंदर सिंग यांनी राजीनामा स्वीकारला

अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी सिद्धू यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविला आहे. यामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांची मंत्रिपदाची कारकीर्द संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या अमरिंदर सिंग यांनी शनिवारी सकाळीच नवज्योतसिंग सिद्धू यांचा राजीनामा पाहिला आणि त्यांनी तो राज्यपालांकडे पाठवून दिला, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, दिल्लीमध्ये असताना अमरिंदर सिंग यांनी आपण सिद्धू यांचा राजीनामा पाहिलेला नाही. तो बघून मगच निर्णय घेऊ असे सांगितले होते. सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अमरिंदर सिंग यांच्या चंदीगढमधील निवासस्थानी पाठवून दिला होता. त्यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी राहुल गांधींकडे राजीनाम्याबद्दल सांगितले होते. 

विंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, पॅराशूट रेजिमेंटला देणार २ महिने

पंजाबमधील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या खात्यांमध्ये बदल केले होते. तेव्हापासून ते नाराज होते. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.