पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील ५ तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या सु्ट्टी

पुण्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.   जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी उद्या  २७ सप्टेंबर, २०१९ रोजी सुट्टी घोषित केली आहे.

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?

पुण्यात बुधवारी रात्री मूसळधार पाऊस झाला. पुढील चार ते पाच दिवसांत असाच पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे शहराला बुधवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. पुण्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अतिप्रचंड होता. पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.  पावासाचे पाणी शहरातील अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये शिरले. यात काहींनी जीवही गमावला आहे. तर चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: pune rains heavy rains lead to waterlogging and traffic schools closed tomorrow in pune district