पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मसूद प्रकरणात पुलवामा हल्ल्यातील पुरावे महत्त्वपूर्ण ठरले'

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात पुलवामा प्रकरणाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मसूदचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीमध्ये समाविष्ट केल्यानंतर पाकिस्तानने या निर्णयाचा संबंध भारतातील लोकसभेच्या निवडणुकीशी जोडला होता. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली. 

Masood Azhar Terrorist : मोदींना निवडणुकीत फायदा होऊ नये म्हणून पाकिस्तानकडून राजकारण

रवीश कुमार म्हणाले की,  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याच्या पुराव्यांच्या आधारे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. परिषदेने अधिसूचनेत मसूदने केलेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांसंदर्भातील माहिती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. 

चीन-पाकला दणका, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

या प्रकरणात चीनच्या भूमिकेबद्दलही रवीश कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. भारताने यासंदर्भात चीनकडे काही प्रस्ताव मांडला होता का? या प्रश्नावर ते म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रकरणामध्ये भारत कोणताही भेदभाव करत नाही. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, ही भारताची प्रमुख भूमिका होती. पुलवामा हल्ल्यात मसूदचा सहभाग असल्याचे पुरावे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात महत्त्वपूर्ण ठरले. या प्रकरणात चीनच्या भूमिकेमुळे भारत-चीनमधील संबंध सुधारतील, असेही ते म्हणाले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pulwama Terror Attack Played a Role in Masood Azhar listing as global terrorist by un says mea