पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्याच्या आणखी एका सूत्रधाराचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा ठार करण्यात जवानांना यश आले. ठार करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. यामधील एक दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर असून तो पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. फैयाज पंजू अशी या दहशतवाद्याची ओळख पटलेली आहे. अनंतनागमध्ये 12 जून रोजी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामध्ये देखील तो सहभागी होता.

बीकेसी ते वाकड फक्त २३ मिनिटांत, हायपरलूप प्रकल्प सहा वर्षांत  
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा येथे झालेल्या चकमकीमध्ये फैयाज पंजू आपल्या साथिदारासोबत मारला गेला. पंजू उर्फ फैयाज अहमद ठोकर हा पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. पंजू एप्रिल 2018 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. तो त्राल-अवंतीपुरा-बिजबेहरा-अशमुकाम भागामध्ये सक्रीय होता. तसचं, फैयाज 12 जून रोजी अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यामध्ये देखील सहभागी होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद झाले होते. तर एक जवान गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान या जवानाचाही मृत्यू झाला होता.'

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला