पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ला हा भाजपचा गोध्रासारखाच कटः शंकरसिंह वाघेला

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिह वाघेला

पुलवामा हल्ला हा भाजपचा गोध्रासारखाच कट असल्याचा गंभीर आरोप गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिह वाघेला यांनी केला आहे. पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेली कार ही गुजरात पासिंगची होती. याच गाडीत आरडीएक्स होते, असे वाघेला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वाघेला यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. पूर्वाश्रमीचे भाजप नेते असलेले वाघेला हे आता राष्ट्रवादीत आहेत.

निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सरकार दहशतवादाचा वापर करत आहे. मागील ५ वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, असे ते म्हणाले. बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये एकही जण मारला गेला नाही. इतकेच काय एकाही आंतरराष्ट्रीच तपास यंत्रणेला २०० दहशतवादी मारले गेल्याचे सिद्ध करता आलेले नाही. बालाकोट एअर स्ट्राइक हा एक पूर्वनियोजित कट होता. असे घडणारच होते, असे वाघेला यांनी म्हटल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

बालाकोट हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानने लढाऊ विमाने पाठविली पण...

२७ फेब्रुवारी २००२ साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-६' डब्याला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. 

वाघेला म्हणाले, पुलवामा हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून इशारा मिळाल्यानंतरही सरकारने काळजी घेतली नाही, आणि जर तुमच्याकडे बालाकोटमधील दहशतवादी तळांबाबत माहिती होती तर तुम्ही आधीच कारवाई का केली नाही. तुम्ही पुलवामा हल्ल्यासारख्या घटनेची वाट पाहत होते काय, असा सवाल त्यांनी केला.

या सर्वामध्ये भाजपचा समावेश आहे. निवडणुका जिंकण्यासाठीच भाजपने हा प्रकार घडवला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

भाजपचे गुजरात मॉडेल हे चुकीचे आणि फसवे आहे. भाजपचे राज्यातील नेते पक्षावर नाराज आहेत. ते स्वतःला मजूर समजत आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.