पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कमी रॅमच्या मोबाईलसाठी आता पबजी लाईट भारतात

पबजी लाईट

कमी क्षमतेच्या कॉम्प्युटरसाठी पबजी लाईट सुरू केल्यानंतर आता कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठीही भारतात पबजी लाईट आणण्यात आले आहे. दोन जीबीपेक्षा कमी रॅम असलेल्या मोबाईलसाठी पबजी लाईट उपयोगी ठरणार आहे. पबजी गेमचे वापरकर्ते वाढविण्यासाठी कंपनीकडून हे लाईट व्हर्जन आणण्यात आले आहे. सध्या केवळ एँड्राईडवरही लाईट व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या लाईट ऍपचा साईज ४९१ एमबी आहे. त्याचे आतापर्यंत ५० लाख डाऊनलोड्स झाले आहेत. पबजी मोबाईल लाईट हे ऍप गेल्यावर्षी टेन्सेंट गेम्स आणि पबजी कॉर्प यांनी निवडक देशांसाठी सुरू केले. ज्यांना हे ऍप हवे आहे. त्यांनी केवळ गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करायचे आहे. 

अजितदादांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, मात्र आमदारांनीच दांडी मारली

पबजी मोबाईल लाईटमध्ये लहान ६० खेळाडूंचा एकावेळी समावेश करता येऊ शकतो. त्याचबरोबर प्रत्येक सामना हा दहा मिनिटांसाठीच खेळवला जातो.