पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरोप सिद्ध करा, निवडणुकीतून माघार घेईन; गौतम गंभीरचे 'आप'ला उत्तर

गौतम गंभीर

पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या उमेदवार अतिशी यांनी केलेले आरोप भाजपचे येथील उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने फेटाळून लावले आहेत. गौतम गंभीर यांनी या प्रकरणावरून थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावरील आरोप सिद्ध करून दाखवावेत मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेईन, असे गौतम गंभीरने म्हटले आहे. पण त्याचवेळी केजरीवाल माझ्यावरील आरोप सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी राजकारण सोडले पाहिजे, असेही आव्हान गौतम गंभीरने दिले.

AAP उमेदवार अतिशींना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, गंभीरवर आरोप

पूर्व दिल्लीतील आपच्या उमेदवार अतिशी आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या निवडणूक प्रचारावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच गुरुवारी अतिशी यांनी गौतम गंभीर याच्यावर बदनामीकारक मजकूर असलेली पत्रके वाटल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेत त्यांना रडू कोसळले. त्यानंतर लगेचच गौतम गंभीरने त्याच्यावरील आरोपांना उत्तर दिले.

अरविंद केजरीवाल यांच्यासारखी व्यक्ती दिल्लीची मुख्यमंत्री आहे, ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे गौतम गंभीरने ट्विट केले आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपनेच हा प्रकार घडवून आणला असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारचे खालच्या स्तरावरील प्रकार करणारा आपचा विभाग आता कार्यरत झाला आहे, असे आपच्याच माजी नेत्या आणि आता भाजपमध्ये आलेल्या शाजिया इल्मी यांनी म्हटले आहे.