पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमाजींच्या पावलांवर चालणार, विदेश मंत्री जयशंकर यांचे पहिले टि्वट

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

परराष्ट्र मंत्रिपदाचा भार घेतल्यानंतर एस. जयशंकर यांनी टि्वट करत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे कौतुक केले आहे. जयशंकर यांनी आपल्या पहिल्या टि्वटमध्ये सुषमा स्वराज यांचे कामच पुढे नेणार असल्याचे म्हटले आहे. माजी परराष्ट्र सचिव असलेल्या जयशंकर यांची मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला होता.

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी मंत्रालयांचे वाटप करताना जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री झाल्यामुळे मिळालेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, माझं पहिलं टि्वट- सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. महत्वाची जबाबदारी मिळाल्यामुळे अभिमानास्पद वाटत आहे. सुषमा स्वराज यांच्या पावलांवर चालणे, ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.

सुषमा स्वराज यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानताना लिहिले...

जयशंकर हे देशातील प्रसिद्ध नोकरशाह राहिलेले आहेत. परराष्ट्र प्रकरणात ते पारंगत आहेत. त्यामुळेच त्यांना तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी परराष्ट्र सचिव केले होते. मोदी सरकारच्या काळातही त्यांच्यावर तीच जबाबदारी देण्यात आली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांना थेट कॅबिनेट मंत्री करत परराष्ट्र मंत्रीच करण्यात आले. मागील वर्षीच जयशंकर हे निवृत्त झाले आहेत. त्यांनी भारत-अमेरिका नागरी अणू करारात महत्वाची भूमिका निभावली होती.

नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील १० प्रमुख चेहरे