पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

JNU मधील विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडविला, प्राध्यापक संतप्त

दिल्ली पोलिसांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांचा मोर्चा अडविला. (फोटो - संजीव वर्मा)

विद्यापीठाच्या विविध सुविधा आणि सेवांच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव तातडीने मागे घेण्यात यावा, यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढला. पण हा मोर्चा पोलिसांनी विद्यापीठाजवळच अडवला. दिल्लीमध्ये पोलिसांनी आधीच १४४ कलम लागू केले असून, जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. 

सरकारबद्दल भाजप-शिवसेनेला विचारा, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसराभोवती मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थी मोर्चाचा विचार करून पोलिसांनी संसद भवन परिसरातील पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्राध्यापक संघटनेने विद्यापीठाच्या आवाराबाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यावर टीका केली. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करणे हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे प्राध्यापक संघटनेने म्हटले आहे.

राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही पद्धतीने जर विद्यार्थी काही करीत असतील तर त्याला पोलिसी बळाचा वापर करून विरोध करणे चुकीचा संदेश देणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, असे प्राध्यापक संघटनेने म्हटले आहे.

विरोधी बाकावर बसताच सेना आक्रमक, पहिल्याच दिवशी संसदेबाहेर निदर्शने

शैक्षणिक शुल्क वाढीवरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहांचे वाढीव शुल्क त्याचबरोबर विद्यापीठाच्या आवारात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड यावरून विद्यार्थी आंदोलन करीत आहेत.