पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: यूपीमध्ये आंदोलन चिघळले, गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश पोलिस

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. फिरोजाबाद येथे गोळी लागून एका नागरिकांचा मृत्यू झाला. या आंदोलनात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी यांनी सांगितले.

दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरले

आंदोलना दरम्यान गोरखपूर, संभल, मुजफ्फरनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. फिरोजाबाद येथे संतप्त आंदोलकांनी नालबंदान पोलिस चौकीला आग लावली. अंदाधुंद गोळीबारात अर्धा डझनपेक्षा जास्त पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. तर आंदोलनकर्त्यांनी १४ वाहनांसह अनेक दुकानांना आग लावली.

सिंचन घोटाळाः अजित पवारांच्या क्लीनचिटवर फडणवीसांचा आक्षेप

दरम्यान, बुलंदशहरामध्ये आंदोलनकर्त्यांनी गाड्या पेटवून दिल्या. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मुजफ्फरनगर आणि बिजनौरमध्ये नमाज अदा केल्यानंतर नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण आले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. 

'फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी ही आघाडी केली'