पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवी तेवढी निदर्शने करा, CAA मागे घेणार नाही - अमित शहा

अमित शहा

तुम्हाला हवी तेवढी निदर्शने करा. पण सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) मागे घेणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशात एका जाहीर सभेत सांगितले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेस देशामध्ये फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला. 

गंभीर स्ट्रोक : हा बॅकअप मॅन पंतचं पॅकअप करु शकतो

लखनऊमध्ये एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसच्या कृतीमुळे देशात फूट पडली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे समाजात याबद्दल खोटी माहिती पसरवित आहे. त्यामुळेच त्याविरोधात जनजागृती करण्यासाठी भाजपकडून जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि विरोधकांचा अपप्रचार थोपविण्यासाठीच भाजपने हे अभियान सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणामध्ये अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. तुम्ही कितीही निदर्शने करा. कितीही मोठ्या आवाजात घोषणा द्या. सुधारित नागरिकत्व कायदा आता मागे घेतला जाणार नाही, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. 

अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे संतप्त

सुधारित नागरिकत्व कायद्यात कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याचा उल्लेख नाही. नागरिकत्व देणारा हा कायदा आहे, यावरही त्यांनी आपल्या भाषणात भर दिला.