नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामा मशीद आणि आसपासच्या परिसरामध्ये आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर भीम आर्मी आणि काही संघटनांनी जामा मशीद आणि आसपासच्या परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात केली. दिल्लीतल्या ठिकठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच या आंदोलनावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर आहे.
Delhi: Congress leader Alka Lamba is also present at the protest against #CitizenshipAmendmentAct, outside Jama Masjid. pic.twitter.com/qjhpUQuRd9
— ANI (@ANI) December 27, 2019
CAA: भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
जामा मशीद परिसरात वेगवेगळ्या संघटना नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या नेता अलका लांबा आणि दिल्लीचे माजी आमदार शोएब इकबाल हे देखील सहभागी झाल्या आहेत. दिल्लीतील जामिया नगर, जामा मशीद आणि चाणक्यपुरी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
एनआरसी आणि एनपीआर म्हणजे गरिबांवरील टॅक्स, राहुल
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी या आंदोलना दरम्यान सरकारवर जोरदार टीका केली आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न देशासमोर आहे. मात्र तुम्ही (पंतप्रधान) एनआरसीसाठी लोकांना त्याच पध्दतीने रांगेत उभे करु इच्छिता जसे नोटाबंदीच्या वेळी केले होते, अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, दिल्लीच्या सीलमपूर भागामध्ये १७ डिसेंबर रोजी आंदोलनाला हिंसक वळण आले होते. या आंदोलनावेळी दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.