पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बोफोर्स घोटाळ्याचा तपास सुरुच राहणारः सीबीआय

बोफोर्स (AFP FILE)

बोफोर्स प्रकरणातील काही महत्त्वाच्या नोंदी हाती लागल्याने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) घेतला आहे. सीबीआय ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांना तपास करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सीबीआयने तपासाची परवानगी मागणारी याचिका गुरुवारी मागे घेतली. याचिका मागे घेतली असली तरी सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरुच राहणार असून या प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयने न्यायालयाला सांगावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

PNB घोटाळा: लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

सीबीआयचे प्रवक्ते नितीन वाकनकर यांनी सांगितले की, मिशेल हार्शमन नावाच्या व्यक्तीच्या खुलाशानंतर सीबीआयने न्यायालयाकडे बोफोर्स प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय ही स्वायत्त संस्था असून त्यांना तपास करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे परवानगी मागणारी याचिका दाखल करण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने विचारला. 

सीबीआयने गुरुवारी दिल्ली न्यायालयातील न्या. नवीन कुमार यांच्या पीठासमोर सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परवानगी मागणारी याचिका मागे घेत आहोत. अर्जदार म्हणून सीबीआयला याचिका मागे घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने यावेळी म्हटले. 

शेतकरी, युवक आणि व्यापाऱ्यांसाठी मोदी सरकार विनाशकारी- मनमोहन सिंग