पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून आता विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आस धूसर

विक्रम लँडरशी संपर्क होणे अशक्य वाटत आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांचा चांद्रयान २ मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरुच आहे. मात्र विक्रम लँडरशी आता संपर्क होणे अशक्यप्राय वाटत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरचे हार्ड लॅडिंग झाले होते.

विनेशने मैदान मारलं, विश्व कुस्ती स्पर्धेतील पहिलं वहिलं पदक

त्यावेळी चंद्रावर दिवस होता. अर्थात सूर्यप्रकाश चंद्रावर पडण्यास सुरुवात झाली होती. चंद्रावरील दिवस हा पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. त्यामुळेच विक्रम लँडरशी १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे इस्रोने स्पष्ट केले होते. मात्र दक्षिण ध्रुवावर आता रात्र होण्यास सुरुवात झाली आहे.  

मोदींच्या विमानाला हवाई हद्द वापरण्यास पाकची मनाई

२० किंवा २१ सप्टेंबरला चंद्रावर रात्र होईल. अर्थात इस्रोकडे आता विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी केवळ गुरुवारचा दिवस आहे. विक्रम लँडरशी संपर्काची आस धूसर होत असताना मोहिमेसंदर्भात कौतुक करणाऱ्या देशवासियांचे इस्रोने ट्विटच्या माध्यमातून आभार मानले आहेत.