पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेश पंतप्रधानांच्या गळाभेटीनंतर प्रियांका म्हणाल्या की, ...

प्रियांका गांधींनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानांची भेट

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधावर चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे नेता आनंद शर्मा आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा देखील दिड तास चाललेल्या बैठकीला उपस्थित होत्या.  

दसऱ्याला राजनाथ सिंह फ्रान्समध्ये करणार शस्त्रपूजा

शेख हसीना यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत प्रियांका गांधी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा आनंद व्यक्त केला आहे. ट्विटवरुन शेअर केलेल्या फोटोसह प्रियांका यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.  'हसीना यांची गळाभेट घेतली. त्यांच्या भेटीसाठी खूप प्रतिक्षा केली. वैयक्तिक जीवनातील वाईट काळातून जोमाने उभारण्याची त्यांच्याकडे कमालीची ताकद आहे. त्यांचा वैचारिक संघर्ष माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे, अशा शब्दांत प्रियांका यांनी शेख हसीना यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. 

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळेना

तत्पूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी जवळपास 7 द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. बांगलादेशच्या पंतप्रधान ३ ऑक्टोबरपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत.