पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझी सुरक्षा कमी करावी, प्रियांका गांधींचे CM आदित्यनाथ यांना पत्र

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील दौऱ्यादरम्यान राज्य सरकारकडून पुरवण्यात येणारी सुरक्षा कौतुकास्पद आहे. पण अधिक सुरक्षा व्यवस्थेमुळे भेटीला येणाऱ्या सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे सुरक्षा कमी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, प्रियांका गांधींनी पत्रामध्ये लिहलंय की, राज्यातील दौऱ्यादरम्यान सरकारकडून पुरविण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था कौतुकास्पद आहे. पण मी तुम्हाला विनंती करते की, राज्यातील दौऱ्यादरम्यान दिली जाणारी सुरक्षा जितकी कमी करता येईल तेवढी कमी करावी. त्यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होणार नाही. 

'IJC चा निकाल अंतिम, पाकला कुठेही दाद मागता येणार नाही'

प्रियांका गांधींनी रायबरेली दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेमुळे सामान्य जनतेला सहन करावा लागलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिले आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतच्या रायबरेली दौऱ्यादरम्यान प्रियांका यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा कड्यामुळे भेटीला आलेल्या लोकांचा हिरमोड झाला. शिवाय त्यांना त्रासही सहन करावा लागला होता.