पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा अधिकार कोणालाच नाही : प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी रविवारी अचानक उत्तर प्रदेशमधील बिजनोरमध्ये जाऊन सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आंदोलनात जीव गमावलेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारतीय असल्याचा पुरावा मागण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.  

CAA : शहरी नक्षली अन् काँग्रेस देशात अफवा पसरवत आहेत : PM मोदी

उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, महासचिव प्रियांका गांधी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हिंसक वळण लागलेल्या भागाचा दौरा केला. यामध्ये त्यांनी बिजनोरमधील आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. 

ममतादीदींना प.बंगालमधील नागरिक 'दुश्मन' का वाटतात?

यापूर्वी प्रियांका गांधी या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये  इंडिया गेटवरील आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप सरकार हे गरिबांच्या विरोधातील असून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी गरिबांसाठी अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली होती. नोटबंदीच्या निर्णयानंतर भाजप सरकार आता राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या माध्यमातून आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जनतेला रांगेत उभा करु पाहत आहे, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला लगावला होता.

NRC बद्दल खोटे कोण बोलले? PM मोदी की शहा, काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशातील वातावरण तापले आहे. या कायदासह राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दाही कळीचा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रॅलीमध्ये भाजपने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मुद्दा चर्चेतच आणला नसल्याचे भाष्य केले होते. यावर काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शहा यांच्या वक्तव्याचा आणि मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत भाजप खोटं बोलत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Priyanka Gandhi Vadra in Bijnor meets the family of Anas who died during protests against CAA