नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील जामिया विद्यापीठातील हिंसेच्या विरोधात काँग्रेसने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. इंडिया गेटसमोर प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या नेत्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरु आहे. जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी प्रियांका गांधी याठिकाणी पोहचल्या आहेत. केसी वेणुगोपाल, एके अँन्टोनी, पीएल पुनिया, अहमद पटेल यांच्यासह अन्य काँग्रेस नेते देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जामिया मिलिया आंदोलन : अक्षय कुमारचा ट्विटरवर खुलासा
रविवारी रात्री जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. नागरिकत्व कायद्यातील बदलांविरोधात विद्यापीठांमध्ये सुरू असलेली आंदोलने थांबल्यानंतरच या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश अरविंद बोबडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
नागरिकत्व कायद्यावरून हिंसक आंदोलने दुर्दैवी आणि वेदनादायी - मोदी
दिल्लीतील विद्यापीठातील घटनेचे पडसाद देशातील इतर विद्यापीठामध्ये देखील उमटतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील कलिना विद्यापीठातील विद्यार्थी देखील रस्त्यावर उतरले आहेत. कलिना विद्यापीठाच्या बाहेर घोषणाबाजी करत दिल्ली पोलिसांचा आणि केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.