पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात मोठी मंदी पण सरकारचे मौनच, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

प्रियांका गांधी

काँगेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अर्थव्यवस्थेतील मरगळीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. देशात मोठी मंदी आहे, पण अर्थमंत्री आणि सरकारमधील लोकांनी मौन साधणंच पसंत केल्याची टीका त्यांनी केली आहे. देशातील सामान्य नागरिक भाजप सरकारच्या आघाडीच्या नेत्यांकडून, अर्थ मंत्र्यांकडून या मंदीवर काही ऐकू इच्छितात, असे टि्वट त्यांनी केले आहे. 

कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा

कारखाने बंद होत आहेत, नोकऱ्या संपुष्टात येत आहे. पण सरकारमधील लोक गप्प बसले आहेत, का ?, असा सवाल करत त्यांनी एक बातमीही या टि्वटसोबत जोडली आहे. या वृत्तानुसार वाहनांच्या विक्रीत मागील १९ वर्षांतील नीचांक नोंदवण्यात आला आहे. ऑटो क्षेत्रात १० लाखांहून अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे. 

लष्कर प्रमुख जनरल रावत होऊ शकतात पहिले सीडीएस अधिकारी

तत्पूर्वी, प्रियांका गांधी यांनी पहलू खान हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचा न्यायालयाच्या निर्णयावर 'धक्कादायक' असल्याचे म्हटले होते. पहलू खान हत्या प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल धक्कादायक आहे. आपल्या देशात अमानवीयतेला कसलाही थारा नसला पाहिजे. जमावाद्वारे हत्या एक मोठा अपराध आहे, असे टि्वट त्यांनी केले होते.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Priyanka Gandhi tweets Severe recession in the country but people sitting in government are silent