पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काय मूर्खपणाय?, राहुल भारतीयच; प्रियांका गांधींचे प्रत्युत्तर

प्रियांका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नोटीस पाठवल्यानंतर त्यांची बहिणी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी राहुलच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. संपूर्ण देशाला माहितीये राहुल गांधी भारतीय आहेत. त्यांचा इथेच जन्म झाला आणि ते इथेच मोठे झालेले संपूर्ण देशाने पाहिले आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आणि त्यांच्याकडून १५ दिवसांत खुलासा मागविला आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, राहुल गांधी भारतीयच आहेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. ते इथेच जन्माला आले आणि इथे वाढल्याचे लोकांनी बघितले आहे. हा काय मूर्खपणा आहे?

काँग्रेसनेही राहुल गांधी यांना पाठविण्यात आलेल्या नोटिसीवर टीका केली. राजकीय हेतूने ही नोटीस पाठविण्यात आली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.