काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाध्यक्ष आणि भाऊ राहुल गांधी हे वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मतदारसंघातून ते जर विजयी झाले तर प्रियांका या अमेठीतून निवडणुकीला उभे राहू शकतात. अमेठी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.
'मोदींपेक्षा अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान करायचं होतं'
प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी 'हिंदूस्थान टाइम्स'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी जर अमेठी आणि वायनाडमध्ये विजयी झाले तर तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवाल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'हे आव्हान नाही' असे म्हटले.
हे तेव्हाच निश्चित केले जाईल जेव्हा माझा भाऊ दोन्ही मतदारसंघापैकी एक सोडण्याचा निर्णय घेईल. तेव्हा चर्चा होईल, असे त्या म्हणाल्या.
टीव्हीवर झळकणे ही राजकीय ताकद नसते, प्रियांका गांधींचा मोदींना टोला
तत्पूर्वी, मिर्झापूर येथील प्रचारसभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. तेथील नागरिकांना संबोधून बोलताना त्यांनी म्हटले होते की, 'आता तुम्हाला समजलं असेलच की तुम्ही जगातील सर्वांत मोठ्या अभिनेत्याला आपला पंतप्रधान केलं आहे. यापेक्षा तर तुम्ही अमिताभ बच्चन यांनाच पंतप्रधान करायचं होतं. काम तर कुणालाच करायचं नाही.'