पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रायबरेलीतून प्रियांका गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

प्रियांका गांधी

केंद्र सरकार रायबरेलीच्या जनतेसोबत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केला आहे. मंगळवारी रायबरेली दौरा करत त्यांनी 'रेल्वे कोच' कारखान्याच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. प्रियांका गांधींनी जवळपास एक तास थांबून आंदोलकांचे समर्थन केले.  

'मंदीवर बोलण्यापूर्वी तुमच्या काळातील अर्थमंत्र्यांशी चर्चा करा'

यावेळी त्या म्हणाल्या की, कारखान्याला महामंडळामध्ये रुपांतरित करण्याचा मोदी सरकारचा डाव कधीही पूर्ण होऊ देणार नाही. कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी जवळपास तासभर त्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. रेल्वे कोच कारखाना हे सोनिया गांधी यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच हा प्रकल्प महामंडळात रुपांतरित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

या प्रकल्पामध्ये ज्या लोकांच्या जमीनी गेल्या त्यांना दिलेल्या नोकरीचे आश्वासनही सरकारने पूर्ण केलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. आदोलनामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, या कारखानासंदर्भातील महामंडळाचा मुद्दा सोनिया गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्रही लिहिले. हा संघर्ष फक्त कारखान्याशी संबंधित कर्मचाऱ्यांपूरता मर्यादित नसून हा रायबरेलीच्या जनतेची समस्या आहे, असे त्यांनी म्हटले आहे.