पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपी पोलिसांनी अराजकता पसरवली, प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

प्रियांका गांधी

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरुन योगी आदित्यनाथ सरकार आणि यूपी पोलिसांवर हल्लाबोल केला. राज्यातील हिंसाचारानंतर आता पोलिस अत्याचार करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बदला घेण्याच्या वक्तव्याच्या आधारे कारवाई करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. 

सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांना धमकावले जात आहे. ७७ वर्षीय आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानातून पकडण्यात आले. त्यांचा नावाच्या ४८ लोकांच्या यादीत समावेश आहे. आम्ही याची राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे तक्रार केली आहे. 

सीएए विरोधी आंदोलनात रेल्वेचे ८० कोटींचे नुकसान, सरकार करणार वसूल

आज सकाळी आमच्याकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यत आले. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेश सरकार, प्रशासन आणि पोलिस यावर बेकायदा पाऊले उचलत आहे. आम्ही यावर एक दस्तावेज तयार करुन राज्यपालांना सोपवला आहे. 

वाराणसी येथेही शांततेने आंदोलन करत असलेल्या मुलांना कारागृहात डांबण्यात आले. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही असे अनेक पुरावे दिले आहेत. देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, मुख्यमंत्र्यांनी बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे. हा देश कृष्ण आणि प्रभू श्रीरामांचा आहे, जे करुणाचे प्रतीक आहेत.

ऑस्ट्रियातील राजदूतांनी घेतले १५ लाख भाड्याचे घर, सरकारने माघारी बोलावले