पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरची जनता राष्ट्रविरोधी राजकारणाने त्रस्त : प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काश्मीर दौऱ्याला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली काश्मीर खोऱ्यातील जनतेचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.  
प्रियांका गांधींनी एक व्हिडिओ रिट्विट करत काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचा दावा केला आहे.

जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नाही : राहुल गांधी

काश्मीर दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना श्रीनगर विमानतळावरुन परत पाठवण्यात आले होते. यावेळी श्रीनगरमध्ये  विमानात बसलेल्या राहुल गांधींशी संवाद साधताना एका स्थानिक महिलेने काश्मीरमधील परिस्थिती चिंताजन असल्याचे सांगितले. निर्बंधामुळे जगणे कठीण झाले असून मुलांच्या सुरक्षिततेबाबत संबंधित महिलेला चिंता सतावत आहे, असे प्रियांकांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.  

J&K : शुक्रवारच्या नमाजनंतर फुटीरतावादी संघटनांकडून निदर्शने

प्रियांका गांधींनी ट्विटमध्ये लिहलंय की, काश्मीरमध्ये अशी परिस्थिती किती दिवस राहणार? राष्ट्रभक्तीच्या नावाखाली ज्यांचा आवाज दाबला जात आहे, अशा लाखों लोकांमधील ही एक महिला आहे. काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी राजकारण सुर असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांनी मिळून याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असे प्रियांका गांधींनी म्हटले आहे.