पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली अरुण जेटलींची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जवळपास ५० मिनिटे चर्चा केली. दरम्यान या चर्चेत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. नव्या सरकारमध्ये आपण कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नसल्याचा निर्णय अरुण जेटली यांनी आज (बुधवारी) घेतला होता. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटलींची नव्या सरकारमधून तूर्त माघार

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर उद्या (गुरुवारी) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींच्या नावाची देखील चर्चा होती. अद्याप नावे समोर आलेे नसली तरी त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाते दिले जाईल, अशी अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळातील नावे जाहीर होण्यापूर्वीच अरुण जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात जबाबदारी देऊ नये, अशी विनंती मोदींना पत्राद्वारे केली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Prime Minister Narendra Modi will meet Arun Jaitleys residence to reconsider his earlier decision and remain in Government