पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : पंतप्रधान मोदी 'मन की बात' मधून साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणूच्या  पार्श्वभूमीवर हा संवाद असणार आहे.  २४ मार्चला पंतप्रधान  मोदींनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. देशात कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१  दिवसांसाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे, त्यानंतर मोदी आज  जनतेशी कोरोना विषाणू, सद्य परिस्थीती या विषयाला केंद्रस्थानी धरून जनतेसमोर आपलं मनोगत व्यक्त करतील. 

कोरोनाशी लढा: टाटा ट्रस्टकडून तब्बल ५०० कोटींची मदत

नेहमी प्रमाणे सकाळी ११ वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी अ‍ॅपवर हा कार्यक्रम प्रक्षेपित होईल. 'मन की बात'चे हिंदीतून प्रसारण झाल्यानंतर लगेचच आकाशवाणीवरून इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचे प्रसारण केले जाईल. गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू सारख्या गंभीर विषयावर मोदींनी दोनदा जनतेला संबोधीत केले आहे. 

कुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या

भारतात शनिवारपर्यंत १ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर १९ जणांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन मोदींनी शनिवारी एका ट्विटच्या माध्यमातून मोदींनी केलं. 

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

कोविड-१९ च्या लढ्यामध्ये देशवासियांना स्वेच्छेने मदत करायची आहे. जनतेच्या मनातील भावना लक्षात घेऊन 'पंतप्रधान सहाय्यता निधी' आणि 'आपतकालीन मदत निधी' च्या माध्यमातून मदत जमा करण्यात येत आहे. स्वस्थ भारतासाठी हा निधी उपयुक्त ठरेल. पीएम केयर्स फंडामध्ये अंशदान करुन देशवासियांनी स्वेच्छेने मदत करावी, असे आवाहन मोदींनी केले. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Prime Minister Narendra Modi will address the nation through his radio programme MannKiBaat