कोरोना विषाणू्चा सामना करण्यासाठी जगभरातील नेत्यांशी आणि देशातील खेळाडंशी संवाद साधल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. लोकसभेत ज्या पक्षांची सदस्य संख्या पाचपेक्षा अधिक आहे अशा पक्षांच्या गटनेत्याशी गटनेत्याशी ते संवाद साधणार आहेत. कोरोना विषाणूसंदर्भातील मुद्यावर ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोदी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण २१ ते ४० वयोगटात, आरोग्य मंत्रालय
Prime Minister Narendra Modi to interact with floor leaders of political parties (who have more than 5 MPs in Parliament) through video conferencing on 8th April at 11 am: Union Minister Pralhad Joshi pic.twitter.com/n3gd9L5l02
— ANI (@ANI) April 4, 2020
लॉकडाऊनमधून राज्य टप्प्याटप्यातून बाहेर पडेल, राजेश टोपेंनी दिले संकेत
चीनच्या वुहान शहरातून भारतात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्याठी नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला होता. कोरोनाविरोधात मोदी सरकारसोबत असल्याची भाषा केल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेताना मजूर वर्गातील लोकांचा विचार केला नाही, अशा शब्दांत मोदींवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले आहे. जगाला प्रभावित करणाऱ्या विषाणूविरोधात लढण्यासाठी सर्व प्रथम मोदींनी सार्क (दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या प्रादेशिक संघटना) च्या प्रमुखांशी चर्चा केली होती. याशिवाय मोदींनी जगभरातील अन्य राष्ट्रांच्या प्रमुखांसोबतही या मुद्यावर चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींनी देशातील आघाडीच्या खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता. देशातील नागरिकांना सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी प्रत्येकाने योगदान गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी मोदींनी केले होते. त्यानंतर आता मोदी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.