पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींनी प्रसिद्धीसाठी ५ हजार २०० कोटी उधळले: प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय. मोदी आणि केजरीवाल निराशजनक काम लवण्यासाठी प्रसिद्धीवर पैशाची उधळण करत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केलाय. दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीच्या संगम विहार येथील प्रचारसभेच्या व्यासपीठावरुन त्यांनी मोदी आणि केजरीवाल यांच्यावर शाब्दिक तोफ डागली.   

मोदी ताजमहालही विकतील, राहुल गांधींचा टोला

आप आणि भाजप दोन्ही पक्ष प्रसिद्धीमध्ये अव्वल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्धीसाठी तब्बल ५ हजार २०० कोटी खर्च केलेत. तर केजरीवालांनी ६११ कोटी रुपयांची उधळण केली आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. जर तुम्ही जनतेसाठी काम केले आहेत तर तुम्हाला प्रसिद्धीसाठी एवढा खर्च का करावा लागतो? असा प्रश्नही प्रियांका गांधी यांनी यावेळी उपस्थितीत केलाय.  काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळात दिल्लीत विकास झाला, असा दावाही प्रियांका गांधी यांनी यावेळी केला. दिल्लीतील रस्ते, उड्डाण पूल आणि मेट्रोची कामे ही शीला दिक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने केल्याचे त्या म्हणाल्या. 

रडणारे विकास करु शकत नाहीत, PM मोदींचा सोनिया गांधींना टोला

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील केजरीवाल सरकारच्या कामावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. दिल्लीतील महाविद्यालये आणि शाळांचा विकास हा काँग्रेसने केलाय. आपने सत्तेत आल्यावर रुग्णालये उभारण्याचे आश्वान दिले पण त्यांना तेही पूर्ण करता आले नाही, असे प्रियांका यावेळी म्हणाल्या.  सध्याच्या घडीला बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. भाजप आणि आपचे नेते यावर काहीच बोलायला तयार नाहीत, असेही प्रियांका गांधी यावेळी म्हणाल्या.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Prime Minister Narendra Modi spent Rs 5200 crore on publicity Priyanka Gandhi at election rally in Delhi