पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदी सोशल मीडियाला 'रामराम' करण्याच्या विचारात

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन. मोदींचे ट्विटर तब्बल ५३.३ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांना ४ कोटी ४७ लोक फॉलो करत आहेत. इन्स्टाग्रावरही त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा हा ३५. २ दशलक्षच्या घरात आहे.

'काँग्रेस खासदाराकडून भाजप महिला सदस्यांसोबत गैरवर्तन'

 

२०१४ च्या निवडणुकामध्ये मोदी लाट निर्माण होण्यामध्ये सोशल मीडियाचा प्रभावी वापर महत्त्वपूर्ण ठरला होता. सोशल मीडियाच्या जोरावरच भाजपाने लोकसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. त्यानंतरही भाजपने सोशल मीडियाचा वापर सुरुच ठेवला. भाजपच्या प्रत्येक नेत्यांने सोशल मीडियाच्या माध्यमातू जनसंपर्क वाढवावा, अशा सूचना खुद्द मोदींनी दिल्या होत्या. 

'नटसम्राट' श्रीराम लागूंच्या नावाने महाराष्ट्र सरकार देणार पुरस्कार

मोदींच्या या सूचनांचे भाजपच्या नेत्यांनी पालनही केले. परिणामी इतर राजकीय पक्षाच्या तुलनेत भाजपचे नेते सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाले. भाजप नेत्यांना सक्रीय करणाऱ्या मोदींनीच सोशल मीडियाला रामराम करण्याचा विचार बोलून दाखवल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मोदींच्या मनात हा निर्णय नक्की का आला? हे मोदी सांगतील तेव्हाच समोर येईल. मोदी आपल्या निर्णयावर ठाम राहणार की जनतेच्या विचार करुन निर्णयात काही बदल करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.