पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. राजभवनमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) च्या मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला धारेवर घेतले असल्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या एका सरकारी कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
शाळांमध्ये CAAचा प्रचार करणे मुर्खपणा, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
विविध मेट्रो शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक इमारतीच्या विकासाचा सरकारचा मानस आहे. याच अनुषंगाने पश्चिम बंगालमधील काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या इमारी मोदींच्याहस्ते राष्ट्रास अर्पण करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमासाठी मोदी दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. कोलकात्यासह दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसीमधील काही इमारतींचा देखील या योजनेत समावेश आहे. या दौऱ्यावर मोदी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्रमातही भाग घेणार आहेत. यावेळी विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंशन फंडासाठी मोदींच्या हस्ते ५०१ कोटी रुपयांचा धनादेश कोलकाता पोर्ट ट्रस्टला देण्यात येणार आहे.
...म्हणून CM ठाकरेंच्या शब्दानंतरही उपोषण करावं लागलं : छ. संभाजीराजे
राजशिष्टाचाराचा भाग म्हणून सरकारी कामानिमित्त राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांचे स्वागत हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येते. यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मोदी-ममता यांच्यातील भेटही अशीच आहे. दोन्ही नेत्यांमध्ये याव्यतिरिक्त कोणत्या विषयावर चर्चा होणे तसे अशक्यच आहे. या भेटीनंतर ममता बॅनर्जी किंवा मोदी हे भाषणाच्या माध्यमातून अथवा अन्य माध्यमातून काय प्रतिक्रिया देणार , हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
#WATCH: PM Narendra Modi meets West Bengal CM Mamata Banerjee in Kolkata. The Prime Minister is in Kolkata to take part in 150th anniversary celebrations of the Kolkata Port Trust. pic.twitter.com/6r6ghcLlSu
— ANI (@ANI) January 11, 2020