पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींकडून भाजप खासदारांची कानउघडणी

भाजप खासदारांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo @BJP4India)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेतील चर्चेवेळी अनुपस्थितीत राहणाऱ्या खासदारांची खरडपट्टी केली. त्याचबरोबर प्रत्येक खासदाराच्या संसदेतील उपस्थितीवर पक्षाची करडी नजर असल्याचे सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महत्वाच्या चर्चेवेळी भाजप खासदार गैरहजर राहिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाराज असल्याचे संकेत मिळाले होते. 

आमदाराच्या 'बॅटिंग'वर मोदी नाराज; म्हणाले, अशांना पक्षात स्थान नाही

त्यांनी खासदारांना विचारले की, जेव्हा अमित शहा तुमच्या रॅलीत येणार आहेत आणि अखेरच्या वेळी जर ते तिथे दिसले नाहीतर तुम्हाला काय वाटेल. त्यावेळी तुम्हाला कसे वाटेल, असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा खासदारांना विचारले. 

मोदी म्हणाले की, जेव्हा तुम्ही २ लाख मतांनी विजयी व्हाल. पण ज्यावेळी तुमच्या जवळच्या मित्राने तुम्हाला मतदान केले नसल्याचे समजते तेव्हा तुम्हाला कसे वाटेल. त्यामुळे सभागृहात जेव्हा उपस्थितीत खासदारांची संख्या पाहतो, त्यावेळी मला अशी जाणीव होते.

तत्पूर्वी, काही क्षण आधी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांना वेळेवर उपस्थितीत राहण्याचे अपील करताना म्हटले की, कायदा मंत्री वादग्रस्त तिहेरी तलाक विधेयक सादर करत होते, त्यावेळे अनेक खासदार सभागृहात उपस्थितीत नव्हते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Prime Minister Narendra Modi pulls up truant MPs at BJP meet says How would you feel if Amit Shah