पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवसानिमित्त मोदींनी केले नर्मदा नदीचे पूजन

मोदींनी केली नर्मदा नदीची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आज ६९ वा वाढदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ते आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातच्या वेगवगळ्या भागामध्ये दौरा करत आहेत.

नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे दाखल झाल्यानंतर मोदींनी इको टूरिझमला भेट दिली. केवडिया येथे 'जंगल सफारी टुरिस्ट पार्क'मध्ये जाऊन त्यांनी जंगल सफारी केली.

आपल्या वाढदिवसानिमित्त मोदी गुजरातमध्ये आहेत. नरेंद्र मोदींनी केवाडियातील सरदार सरोवर धरण येथे भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची पाहणी केली.   मोदींनी केवाडिया येथील बटरफ्लाय गार्डनला भेट देऊन त्यांनी फुलपाखरांना उडवले.

त्यानंतर मोदींनी नर्मदा नदीची पूजा आणि आरती केली. १०० पुजाऱ्यांद्वारे ही पूजा संपन्न झाली. यावेळी मोदींसोबत  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, माजी मुख्यमंत्री नितिन पटेल उपस्थित होते. त्यानंतर नर्मदा जिल्ह्यातल्या गुरुदेश्वर दत्त मंदिरात त्यांनी पूजा आणि आरती केली.