पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ह्यूस्टनला पोहोचले मोदी, ऊर्जा क्षेत्रातील सीईओंची घेतली भेट

ह्यूस्टनला पोहोचले मोदी, ऊर्जा क्षेत्रातील सीईओंची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील 'एनर्जी सिटी' समजल्या जाणाऱ्या ह्यूस्टनमध्ये तेल क्षेत्रातील विविध कंपनींच्या सीईओंबरोबर बैठक घेतली. ही बैठक खूप महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यानचे सहकार्य विस्तारण्याच्या उद्देशाने ही बैठक झाली. पंतप्रधान मोदी एक आठवड्याच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान, आज रात्री ८.३० वाजता पंतप्रधान मोदी हे 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर ह्यूस्टनच्या जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदी हे उतरले. विमानातून उतरताच ट्रेड अँड इंटरनॅशनल अफेअर्सचे संचालक ख्रिस्तफर ओल्सन यांनी मोदींचे स्वागत केले. अमेरिकेचे अनेक अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या सर्वांशी पंतप्रधानांनी हस्तांदोलन केले.

लिव-इनपेक्षा विवाहित महिला अधिक आनंदीः RSS

ट्रम्प प्रशासन या आठवड्यात भारताबरोबर व्यापार कराराबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर मोठी घोषणा होऊ शकते. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या ट्रेड वॉरमुळे डोनाल्ड ट्रम्प हे नव्या बाजाराचा शोध घेत आहेत.

पंतप्रधान मोदींनी भारतातून उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे विमान शनिवारी सकाळी जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये दोन तास थांबले. जर्मनीतील भारती राजदूत मुक्ता तोमर आणि महावाणिज्य दूत प्रतिभा पारकर यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचे विशेष विमान ह्यूस्टनच्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले. 

दरम्यान, पंतप्रधान ज्या कार्यक्रमाची मोठी चर्चा सुरु आहे. त्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ह्यूस्टन येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ५० हजार भारतीय लोक सहभागी होतील. टेक्सास इंडियाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पण सहभागी होत आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. तीन तास तो चालेल. अनेक महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमापूर्वी एक कार रॅलीचेही आयोजनही केले जाणार आहे.