पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी शपथ घेण्याची शक्यता

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता येत्या गुरुवारी, ३० मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी शक्यता आहे. त्यांच्यासोबत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांच्या काही महत्त्वाच्या खासदारांना मंत्रिपदाची शपथ यावेळी दिली जाईल. याबाबत औपचारिक घोषणा अजून झालेली नाही. भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक आज, शनिवारी संध्याकाळी होते आहे. त्यामध्ये पुढील गोष्टी निश्चित केल्या जातील.

मोदी सरकारकडून १६ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये झाली. त्यात सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला. औपचारिकपणे नरेंद्र मोदी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली. राष्ट्रपतींनी ही लोकसभा विसर्जित केली की पुढील लोकसभा अस्तित्त्वात येईल. राष्ट्रपतींना भेटल्यावर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्याबद्दल माहिती दिली. या ट्विटमध्ये म्हटले होते की, या कार्यकाळातील सूर्याचा अस्त झाला आहे. पण आमच्या कामाच्या प्रकाशामुळे लाखो लोकांचे जीवन उजळून निघेल. नव्या सूर्योद्याची वाट पाहतोय.

आज संसदीय मंडळाची बैठक
भाजपच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज नवी दिल्लीमध्ये होते आहे. त्यामध्ये औपचारिकपणे नरेंद्र मोदी यांची संसदीय मंडळाचा नेता म्हणून निवड केली जाणार आहे. ही निवड झाल्यानंतरच राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल.

हा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया

शनिवारी संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक होते आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित असतील. या बैठकीत नरेंद्र मोदी उपस्थितांशी संवाद साधतील, अशीही चर्चा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नरेंद्र मोदी नेते असतील, हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. आज केवळ औपचारिकपणे त्याची घोषणा होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर ३०२ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत.