पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदी जगातील सर्वात ताकदवान नेते; ट्रम्प, पुतीनही मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जगातील सर्वांत ताकदवान नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी या निवडीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना मात दिली आहे. ब्रिटिश हेराल्डच्या 'रिडर्स पोल २०१९' नुसार ही निवड करण्यात आली आहे.

जगातील सर्वात ताकदवान नेते कोण, हे शोधण्यासाठी ब्रिटिश हेराल्डने वाचकांचा कौल जाणून घेतला. ताकदवान नेत्यांच्या यादीमध्ये जगातील २५ देशांच्या प्रमुखांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर परीक्षक मंडळाने या २५ नेत्यांमधून चौघांची अंतिम फेरीसाठी निवड केली. त्यामध्ये नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन आणि क्षी जिनपिंग यांच्या नावाचा समावेश होता. या चार जणांमधून अखेर नरेंद्र मोदी यांची सर्वात ताकदवान नेते म्हणून निवड करण्यात आली. ताकदवान नेत्याची निवड करताना विविध मुद्द्यांच्या आधारे चाळण्या लावण्यात आल्या होत्या. त्यासर्वांतून ही निवड करण्यात आली.

भारताला धक्का; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीला स्थान नाही

ब्रिटिश हेराल्डच्या या सर्वेक्षणात मतदान करणाऱ्या प्रत्येकासाठी वन टाइम पासवर्ड देण्यात आला होता. जेणेकरून कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा मतदान करू नये. आपल्या आवडत्या नेत्याची निवड व्हावी, यासाठी जगातील विविध देशांतील लोक ऑनलाईन मतदान करीत होते. मतदान सुरू असताना एकदा वेबसाईट बंदही पडली होती. गेल्या शनिवारी मतदानाची प्रक्रिया समाप्त झाली होती. 

नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आता ब्रिटिश हेराल्डच्या जुलैमधील अंकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात येईल. 

कोणाला किती टक्के मते मिळाली?
नेता                 मतांची टक्केवारी
नरेंद्र मोदी             ३०.९% 
व्लादिमीर पुतीन     २९.९ %
डोनाल्ड ट्रम्प          २१.९ % 
क्षी जिनपिंग           १८.१ %