पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : US प्रसारमाध्यमांसमोर ट्रम्प म्हणाले, मोदी माझे मित्र!

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे मित्र असल्याचे म्हटले आहे. भारत दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २४ आणि २५ दोन दिवस ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टनच्या जॉइंट एंड्रुस बेसहून ते 'एअर फोर्स वन' या विमानाने ते भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया, मुलगी इंवाका, आणि जावई डॅरेड ककनर हे देखील भारत दौऱ्यावर येणार आहे.  

ट्रम्प यांच्या दौऱ्यात भारत-अमेरिका यांच्यात हा मोठा 'सौदा' अपेक्षित

ट्रम्प सोमवारी अहमदाबाद विमानतळावर दाखल होतील. विमानतळावरुन भव्य रॅलीसह ते मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर आयोजित 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला हजेरी लावतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्यासोबत असतील. दोन्ही नेते संयुक्तपणे जनसभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ट्रम्प महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट देतील. 

नौदलाचे मिग-२९ विमान कोसळले, पायलट सुरक्षित

अमेरिकन प्रसारमाध्यमांनी भारत दौऱ्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, भारतातील लाखोंच्या गर्दीच्या अनुभूतीसाठी मी उत्सुक आहे. मोदींसोबत मित्रत्वाचे संबंध आहेत. भारत दौऱ्यासंदर्भात मी खूप दिवसांपूर्वी वचन दिले होते. या दौऱ्यासाठी मी उत्सुक आहे. भारतात माझ्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मी ऐकले आहे. भारतामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असेल, असे मोदींनीही म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेत झालेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. यावेळी ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर नक्की येईन, असे म्हटले आहे.