प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी दीपा शहा नावाच्या एका महिला लाभार्थीने आपल्याला या योजनेचा कसा फायदा झाला याचे सविस्तर वर्णन केले. त्याचवेळी मी प्रत्यक्ष देव कधी बघितला नाही. पण नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपण देवच बघितला असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलेचे मनोगत ऐकताना नरेंद्र मोदी भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
VIDEO : १०० दिवसांत काय केले १११ सेकंदात पाहा, शिवसेनेचा खास व्हिडिओ
जनौषधी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचीही चर्चा केली. कोरोनाच्या निमित्ताने पसरविण्यात येणाऱ्या अफवांपासून दूर राहा. त्यावर कोणताही विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना संदर्भात केवळ डॉक्टर आणि तज्ज्ञांनी दिलेला सल्लाच माना, इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
#WATCH Prime Minister Narendra Modi gets emotional after Pradhan Mantri Bhartiya Janaushadi Pariyojana beneficiary Deepa Shah breaks down during interaction with PM. pic.twitter.com/Ihs2kRvkaI
— ANI (@ANI) March 7, 2020
जगातील सर्व देशात पुन्हा एकदा होत जोडून नमस्कार करण्याची पद्धत रुढ होऊ लागली आहे. जर काही कारणामुळे आपण ही पद्धत सोडून दिली असेल, तर कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण याकडे वळले पाहिजे. हस्तांदोलनापेक्षा हात जोडून नमस्कार करण्यावर आपण भर दिला पाहिजे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंजाबमध्ये प्राथमिक तपासणीत दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट
देशात प्रत्येक महिन्याला एक कोटीहून अधिक कुटुंबीय जनौषधी घेतात. आता राज्य सरकारच्या डॉक्टरांनीही रुग्णांना जनौषधी लिहून दिल्या पाहिजे, असे आवाहन मी करतो, असे त्यांनी सांगितले.