पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी PM मोदींनी घेतला अर्थतज्ज्ञांकडून सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील अर्थतज्ज्ञ आणि उद्योग जगतातील तज्ज्ञांसोबत चर्चा केली. निती आयोगाच्यावतीने 'इकोनॉमिक पॉलिसी-द रोड अहेड' या नावाने चर्चा सत्र पार पडले. या कार्यक्रमात ४० हून अधिक अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील जाणकार सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तज्ज्ञांनी देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, शेती, जलसिंचन, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर आपली मते मांडली, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. केंद्रीय  अर्थमंत्री निर्मला सीतारमन ५ जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Prime Minister Narendra Modi attended an interactive session with over 40 economists and other experts