पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणालाही कामावरुन काढू नका, पंतप्रधानांचं पुन्हा आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

'सध्याची परिस्थिती कठीण आहे अशावेळी व्यवसाय, उद्योगधंदे मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील वागा कोणालाही नोकरीवरून काढून टाकू नका', असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा केलं आहे. देशात लॉकडाऊनचा  कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. त्याचबरोबर देशाच्या हितासाठी सात गोष्टीत मला साथ  द्या असं आवाहन मोदींनी केलं आहे.

'कोरोनाविरोधात सर्वजण एकत्र, यापेक्षा मोठी देशभक्ती नाही'

आवाहन करुनही अनेक मालकांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे मोदींनी पुन्हा एकदा संवेदनशील वागत कर्मचाऱ्यांचा विचार करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच 'आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्या. ज्या ज्येष्ठ व्यक्तींना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्या तब्येतीला जपा, त्यांना कोरोनापासून वाचवा' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार पार, ३३९ रुग्णांचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करा असं चौथं आवाहन मोदींनी केलं आहे, तर घरातच तयार केलेल्या फेस कव्हर आणि फेस मास्कचा वापर करा असंही मोदींनी सांगितलं आहे.  मुंबईसह अनेक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, मात्र घरच्या घरी तयार करण्यात आलेले मास्क वापरा असंही त्यांनी सांगितलं आहे. 

शाहरूखकडून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी २५ हजार PPE किट्स

कोरोनाच्या लढ्यात दिवसरात्र  मेहनत घेणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी या सर्वांचा आदर करा. आजूबाजूच्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा अशीही विनंती मोदींनी केली आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जे निर्देश दिले आहे त्यांचे पालन करा, कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा असंही मोदी म्हणाले. 

या  स्पतपदी म्हणजे विजय प्राप्त करण्याचा मार्ग आहे, निष्ठेनं याला साथ द्या. ३ मे पर्यंत लॉकडाऊच्या नियमांचे पालन करा जिथे आहे तिथे थांबा नियमांचे पालन करा, अशीही विनंती त्यांनी देशवासीयांना केली आहे.