पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

UN Climate Summit: चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरज- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ANI)

अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलवायू परिवर्तन या विषयावर संयुक्त राष्ट्राला संबोधित केले. जगभरातील देशांनी याबाबत गंभीर होण्याची गरज आहे. आता चर्चा करण्याची वेळ संपली आहे. जगाला काम दाखवण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्टपणे सांगत या दिशेने जितके प्रयत्न व्हायला हवेत तितके होत नसल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला. 

तत्पूर्वी मोदी म्हणाले की, हा अत्यंत सुखद संयोग आहे की, न्यूयॉर्क दौऱ्यातील माझी पहिली सभा ही वातावरण बदलावर होत आहे. जगभरात या आव्हानांशी निपटण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आपण हे स्वीकारले पाहिजे की, यासाठी जितके प्रयत्न करण्याची गरज आहे. तितके होताना दिसत नाही.

निसर्गाचा सन्मान आणि नैसर्गिक साधनांचे संरक्षण आपली परंपरा आणि वर्तमान नीतीचा हिस्सा आहे. लालसा नाही तर गरजा पूर्ण करणे आपला सिद्धांत आहे. त्यामुळे भारत या विषयावर केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर एक व्यावहारिक विचार आणि आराखड्यासह इथे आला आहे. आम्ही इंधनात नॉन फॉसिल फ्यूएलचा हिस्सा वाढवत आहोत. पेट्रोल, डिझेल आणि बायोफ्यूएलची मिश्रण आणि परिवहनमध्ये इलेक्ट्रिक वाहने वाढवण्यावर भर देत आहोत.

भारताने जल संरक्षणसाठी 'जल जीवन मिशन'ची सुरुवात केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही काम केले. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात भारताद्वारे लावण्यात आलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन करणार. आम्ही देशाच्या स्वातंत्र्य दिनापासून प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले.