पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लक्ष्मण रेषे'चे पालन करा, पंतप्रधानांचा जनतेला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी

'कोरोना विषाणू जगात प्रत्येकाला ललकारत आहे, मात्र या विषाणूशी लढण्याकरता प्रत्येकानं एकजूट व्हा. काही लोक नियम तोडत आहेत.  कारण ते सध्याच्या परिस्थितीचं गंभीर्य समजत नाही. मात्र नियम तोडाल तर या विषाणूपासून वाचणं कठीण आहे त्यामुळे 'लक्ष्मण रेषे'चे पालन करा, असा महत्त्वपूर्ण संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

ही गोष्ट गांभीर्यानं न घेतल्यानं काही देशांवर पश्चात्ताप करण्याची वेळ आहे, असंही मोदी म्हणाले. 'नियम तोडणारे आयुष्यासोबत खेळ करत आहेत, मात्र परिस्थितीचं गांभीर्य समजून त्याप्रमाणे वागा. पोलिसांना सहकार्य करा, अशी विनंती मोदींनी केली आहे. आज मन की बात या कार्यक्रमातून मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

'त्या' कठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी

त्या 'हिरों'चं कौतुक
यावेळी पंतप्रधानांनी रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या नर्सेस, डॉक्टरांचं कौतुक आहे. मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, असं ते म्हणाले. डॉक्टर आणि या आजारातून बरे झालेल्या रुग्णांशीही त्यांनी या कार्यक्रमात  संवाद साधला त्यांच्याकडून काही सल्लेही घेतले. यावेळी ही लढाई आपण जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हे  सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांचे सल्ले  ऐका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 

रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या नर्सेस, डॉक्टरांचं कौतुक

'ते देखील खरे हिरो'
काही लोक स्वत: समाजसेवेसाठी सगळ्यात पुढे आले आहेत. ते देखील रिअरल लाइफ हिरो आहेत. त्यांच्यामुळे आपलं जीवन सुरुळीत सुरु आहेत. आज डॉक्टरांसोबत अत्यावश्यक सुवीधा पुरवणारे कित्येक लोक आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करत आहेत त्यांच्यापाठीवर देखील मोदींची कौतुकाची थाप ठेवली आहे. 

कोरोना : घरी जाण्यासाठी २०० किलोमीटरची पायपीट, मात्र रस्त्यात मृत्यू

दिल्ली कोरोना

'कोरोना विषाणू बाधित  रुग्णांसोबत चुकीचं वर्तन करु नका'
मी केवळ सोशल डिस्टन्स ठेवायला सांगितलं आहे इमोशनल नाही, असं देखील मोदींनी यावेळी सांगितलं. कोरोना बाधित रुग्ण, त्यांचे परिवार तसेच होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींसोबत समाजातील काही लोक चुकीचं वर्तणुक करत आहेत त्यांना मोदींनी 'मन की बात'मधून फटकारलं आहे. रुग्ण  किंवा होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींशी चुकीचं वागू नका, ते अपराधी नाहीत. काही लोक इतरांना वाचवण्यासाठी क्वारंटाइन झाले आहे. त्यांच्याशी गैरवर्तन करु नका, अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. 

२५ कोटी दान करण्याआधी पत्नी ट्विंकलनं अक्षयला विचाराला होता एक प्रश्न

'गरीबांप्रती अधिक संवेदनशील राहा'
हा संकटाचा काळ आहे, या संकटाच्या घडीला गरीबांसोबत उभं राहा. ज्या गरीबांचं हातावर पोट आहे त्यांची काळजी घ्या. त्यांच्याबाबत संवेदनशीलपणा दाखवा. त्यांच्या गरजा लक्षा घ्या. त्यांना मदत करा  अशी कळकळीची विनंतीही पंतप्रधानांनी केली आहे. 

कोरोना मदत