पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कठोर निर्णयासाठी मी तुमची माफी मागतो - पंतप्रधान मोदी

मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या  पार्श्वभूमीवर मोदींनी हा संवाद साधला.  या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी देशवासीयांची माफी मागितली आहे. 'काही निर्णयांमुळे गरीब लोकांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे, म्हणूनच मी त्यांची माफी  मागत आहे,  मी तुमच्या समस्या जाणतो, मात्र कोरोनाशी लढण्याकरता  दुसरा कोणताही रस्ता तूर्त नाही. ही जीवन मृत्यूची लढाई आहे. त्यामुळे देशासाठी, देशवासीयांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात., असं ते म्हणाले.

कोरोना : घरी जाण्यासाठी २०० किलोमीटरची पायपीट, मात्र रस्त्यात मृत्यू

जगाची सध्याची ही परिस्थीती पाहता हे निर्णय घेणं भाग आहे. यामुळे देशवासीयांना काही दिवस कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल, मात्र मी पुन्हा एकदा त्यासाठी मनापासून माफी मागतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

लॉकडाऊनच्या घोषणनेनंतर दिल्ली  महाराष्ट्रमधून हजारो मजूर पायपीट करत आपल्या गावी निघाले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामच मिळत नसल्यानं पोट कसं भरणार? असा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे जीव धोक्यात घालून कोणी दूधाच्या टँकरमध्ये लपूनछपून तर कोणी पायपीट करत प्रवास करत आहे.

विश्वचषकातला 'हिरो' जोगिंदर कोरोनाविरोधातील लढाईत ठरतोय 'जगाचा हिरो'

मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलावी लागतात. आज काही देशांची वाइट परिस्थिती आहे ही परिस्थिती इथे येऊ नये म्हणूनच काही निर्णय घेतले आहेत, असं ते म्हणाले.